मोठी बातमी ! नरेंद्र मोदी 9 जून रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ!

Modi Oath Ceremony । लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने आपल्या मित्रपक्षाच्या मदतीने विजय मिळवला आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपने आता नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा तारीख जाहीर केली आहे. नरेंद्र मोदी येत्या 9 जून रोजी म्हणजेच रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणारआहेत.
9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार Modi Oath Ceremony ।
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी रविवारी शपथ घेणार असल्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे. हा शपथ विधी संध्याकाळी ६ वाजता पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण योजना आखण्यात आली आहे. सरकारने राष्ट्रपती सचिवालयातून 7000 ते 8000 लोकांसाठी जागा मागितली आहे.
आदिवासी महिला, पद्म पुरस्कार विजेत्यांचाही समावेश Modi Oath Ceremony ।
प्राप्त माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, एनईसी सदस्य आणि बाहेर जाणारे खासदार, सर्व खासदार, आमदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, क्लस्टर प्रभारी, लोकसभा प्रभारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबतच पंतप्रधानांच्या हस्ते मान की बात सहभागी, आदिवासी महिला, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री विजेते देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधीत्व या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.





