“अटलबिहारी वाजपेयींपेक्षा मोदी वेगळे..” ‘या’ माजी पंतप्रधानांनी स्पष्टचं सांगितलं
Updated On:

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी. देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात टिप्पणी केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना देवेगौडा म्हणाले की मोदी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा वेगळे आहेत.
वाजपेयी लोकसभेच्या १८० जागांचा आकडा ओलांडू शकले नव्हते. मात्र मोदी यांनी पहिल्याच वेळी ३०६ चा आकडा ओलांडला होता आणि आता चारशे जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. त्यांनी केवळ भारतातच नाही तर परदेशांतही आपली ओळख निर्माण केली आहे.
मोदींची ताकद जगाने मान्य केली आहे. जे लोक आज मोदी यांच्याबाबत बोलत आहेत त्यांच्या संदर्भात मी काही चुकीचे बोलणार नाही मात्र एवढेच सांगेन की, आपल्या राजकीय लाभासाठी ते लोक चुकीची विधाने करत आहेत.





