राहुल गांधींचं अकाउंट बंद करण्यासाठी मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव; काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली– काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. याबाबतची माहिती काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली होती. राहुल यांचं ट्विटर अकाउंट बंद केल्याचे कारण ट्विटरने न्यायालयात स्पष्ट केलं.
राहुल गांधी यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव आणला गेल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ट्विटर मोदी सरकारला घाबरलं असून त्यामुळेच राहुल यांचं ट्विटर अकाउंट ब्लॉक केल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.
Why has @twitter locked @RahulGandhi‘s profile? If they are citing rule violations, why wasn’t @amitmalviya‘s account suspended when he put up the photo of the Hathras rape victim? Is twitter being pressured by the Modi govt? The rules must be the same for everyone!
— Dr. Shama Mohamed (@drshamamohd) August 11, 2021
काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी राहुल यांचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल यांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अकाउंट बंद करण्यात आलं आहे. तर मग हाथरस बलात्कार पीडितेच्या माता-पित्यांचा फोटो ट्विटर शेअर कऱणाऱ्या अमित मालवीय यांचं अकाउंट का बंद करण्यात आलं नाही. नियम सर्वांसाठी सारखेच असावे असंही डॉ. शमा यांनी म्हटलं. अमित मालवीय भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.





