Rahul Gandhi : “वर्षभरातच मोदी सरकार पडणार”; राहुल गांधींच मोठं विधान, राजकारणात मोठी खळबळ
त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप केंद्र सरकार किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या विधानांमुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

Rahul Gandhi | Narendra Modi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकार आणि देशातील संस्थांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय आदिवासी प्रोफेशनल कॉन्क्लेवमध्ये बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि लोकशाही व्यवस्थेबाबत गंभीर इशारे दिले.
राहुल गांधी यांनी दावा केला की, देशात आर्थिक अस्थिरतेसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच काही संस्थात्मक यंत्रणांमध्ये अंतर्गत दबाव आणि तणाव वाढत असल्याचे संकेत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे असेही म्हटले की, देशातील निवडणूक प्रक्रिया, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर दबाव असल्याची चर्चा समोर येत आहे. काही अधिकारी अस्वस्थ असल्याचे संकेत मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच भाषणात राहुल गांधी यांनी राजकीय भविष्याबाबतही मोठे विधान केले. “वर्षभराच्या आत केंद्रात मोठे राजकीय बदल दिसू शकतात,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. तसेच देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप केंद्र सरकार किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या विधानांमुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात या वक्तव्यांवर भाजप आणि इतर राजकीय पक्ष काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






