मोदी सरकार अडचणीत ! पेगॅसस प्रकरणात सुप्रिम कोर्टात आणखी एक याचिका
Updated On:

नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरणात जो नवा गौप्यस्फोट समोर आला आहे, त्या प्रकरणाची दखल घेऊन कोर्टात स्वताहून कारवाई करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
एम.एल. शर्मा नावाच्या वकिलाने ही याचिका सादर केली असून त्यात त्यांनी पेगॅसस खरेदी करार रद्द करावा आणि यासाठी इस्त्रायलला दिलेले पैसे परत मागून घ्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिला पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे. पेगॅसस खरेदी कराराला संसदेची संमती नसल्याने हा करार तातडीने रद्द केला पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.





