वाराणसी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. सर्वच पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर मिळेल त्या शब्दात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदींवर हल्लाबोल केला आहेत.
#WATCH Sanjay Nirupam, Congress, in Varanasi: I feel that the person that people here have chosen- that Narendra Modi is actually the modern incarnation of Aurangzeb. (07.05.2019) pic.twitter.com/u6x0UsgU3D
— ANI UP (@ANINewsUP) May 8, 2019
संजय निरुपम म्हणाले की, वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत, अशी खोचक टीका संजय निरुपम यांनी केली आहे.