Mock Drill in India: CSK – KKR यांच्यातील सामना संकटात? ब्लॅकआऊट झाले तर काय होणार? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी संपूर्ण देशात मॉकड्रिल केलं जाणार आहे. यावेळी काही ठिकाणी रात्री ब्लॅकआऊटचा अभ्यासही केला जाणार आहे.
जर असे झाले तर याचा आयपीएल सामन्यांवर काही परिणाम होईल का? कारण 7 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. जर या सामन्यादरम्यान ब्लॅकआऊट झालं तर सामना पूर्ण कसा होणार? या सामन्यावर काही संकट आहे का? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले असतील तर त्याची उत्तरे आपण जाणून घेऊयात…
कोलकाता – चेन्नई यांच्यातील सामन्यावर ब्लॅकआऊटचा काय परिणाम होणार?
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने बुधवारी होणाऱ्य मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊटसाठी काही ठिकाणं निश्चित केली आहेत. पण या यादीत पश्चिम बंगालमधील कोलकात्याचं नाव नाही. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता सोडून इतर ठिकाण यात आहेत. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये होणाऱ्या सामन्यावर कोणताच परिणाम होणार नाही.
जरी ब्लॅकआऊटमध्ये कोलकात्याचं नाव असतं तरी काही फरक पडला नसता. कारण कोलकात्याच्या ईडन गार्डनवर राज्याकडून वीज घेतली जात नाही. ईडन गार्डन्सवर जनरेटर्सचा वापर केला जातो. डे नाईट सामन्यात याचा वापर होतो. त्यामुळे या सामन्यावर काहीच परिणाम होणार नाही. क्रिकेट चाहते या सामन्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतात.
दोन्ही संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता फक्त औपचारिक सामने खेळत आहे. पण कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कोलकात्याने 11 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे कोलकाता 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कोलकात्याने उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर 17 गुण होतील आणि प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल मात्र त्यांचा तीन पैकी एका सामन्यात पराभव झाला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.





