पुणे – मारहाण करुन जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. शोएब सिकंदर खान (19,रा.हडपसर), मतिन सलिम कुरणे (26,रा.भवानी पेठ) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तक्रारदार व्यक्ती भवानी पेठ येथील हौसिंग सोसायटीजवळ मोबाईलवर गाणी ऐकत होता. यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तेथे दाखल झाल्या. त्यांनी त्याला हाताने मारहाण करत खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. यानंतर तीघेही आरोपी पळून गेले.
गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीचा शोध घेत असताना पोलिस शिपाई वैभव देसाई व दत्ता सोनवणे यांना यातील दोन आरोपी पदमजी पार्क येथे थांबले आहेत. त्यांनी तेथे धाव घेत खान व कुरणे यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी साथीदार नोमान अरिफ सय्यद (20,रा.हडपसर) याच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज हाळे, प्रदीप पलांडे व तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.