मोबाईल फोन लवकरच कालबाह्य होणार – मार्क झुकरबर्ग

नवी दिल्ली – सध्या स्मार्टफोन जगातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. गेल्या 30 वर्षापासून नागरिक स्मार्टफोनच्या माध्यमातून परस्परांशी संपर्क साधतात. त्याचबरोबर इतर अनेक कामे करतात. मात्र तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. अशा परिस्थितीत पुढील दशकभरात मोबाईल फोनची जागा स्मार्ट ग्लासेस घेणार असल्याचे भाकीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी केले आहे.
भविष्यातील गरजांचा आढावा घेऊन स्मार्ट ग्लास क्षेत्रात झुकरबर्ग यांची मेटा कंपनी आणि आयफोन निर्माती अॅपल कंपनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. गेल्या 30 वर्षांमध्ये मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातल्या त्यात गेल्या वीस वर्षापासून स्मार्टफोन नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
यामध्ये संपर्क यंत्राने बरोबरच मिनी संगणक उपलब्ध झाला आहे. त्यामुळे संगणकावरची बहुतांश कामे सध्या स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जात आहेत. मात्र लवकरच स्मार्टफोनच्या डिस्प्लेची जागा स्मार्ट ग्लासेस घेतील. हातात स्मार्टफोन न ठेवता बरीच कामे हाताचा वापर न करता केली जाऊ शकतील. स्मार्ट ग्लासेस घातल्यानंतर स्मार्टफोन खिशात असला तरी स्मार्टफोनची कामे सहजरीत्या होऊ शकतील असे तंत्रज्ञान विकसित होत आहे.
अगोदर मोठा फोन होता. त्यानंतर एसटीडी आला. त्यानंतर साधा फोन आला आणि पुढे स्मार्टफोन आले. आता स्मार्टफोनची जागा स्मार्ट ग्लासेस घेण्याची शक्यता आहे. याचा कालावधी दूर नाही. 2030 मध्ये स्मार्टफोन च्या जागेवर बरेच लोक स्मार्ट ग्लासेस वापरत असतील. त्यांचा हाताचा वापर कमी होणार असल्यामुळे त्यांना आरामदायकरीत्या स्मार्टफोनची कामे करता येऊ शकतील असे झुकरबर्ग यांनी भाकीत केले आहे.





