पुणे – सर्वजण मोबाईलमध्ये नवनवीन अॅप डाउनलोड करत असतात. ते डाउनलोड करत असताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. डाउनलोड केलेल्या अॅप्लीकेशन बाबत दिलेले नियम व अटी वाचत नाहीत. यामुळे अनेकवेळा आपली फसवणुक होते. फसवणुक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पिंपरी चिंचवड पोलीसांनी माहिती दिली आहे. त्यामुळे कोणतेही अॅप डाउनलोड करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
1) अॅप्लीकेशन डाउनलोड करताना फक्त अधिकृत स्टोअरचाच वापर करावा.
2) फोनमधील मालवेअर काढुन टाकण्यासाठी फॅक्टरी सेटिंगमध्ये फोन रीसेट करावा.
3) डाउनलोड केलेल्या अॅप बाबत दिलेले नियम व अटी याचे वाचन करून सुनिश्चित करावे.
4) जे अॅप वापरत नसाल ते काढुन टाकावे.
5) नेहमी अधिकृत अॅन्टाव्हरस इन्स्टाॅल करावा व नेहमी अपडेट ठेवावा.
6) अॅप व त्याचा डेव्हलपर्स बाबत प्रतिक्रिया वाचुन तसेच त्याबाबत रिसर्च करून मगच वापरावे.
7) शीर्षक व विवरण मधील चुकाचा शोध घ्यावा.
8) खरेदीवर सुट देणाऱ्या अॅप पासून सावधान राहा.
9) ई-मेल, सोशल मिडीया वरील आलेल्या लिंकना क्लिक करून अॅप डाउनलोड करू नका.
10) अॅपलीकेशन प्रकाशन चा दिनांक पहावा. बनावट अॅपमध्ये प्रकाशन दिनांक आताचा/जवळचा असतो.
मोबाईल ॲप्लीकेशन सुरक्षा
Mobile Application Security. @InfoSecAwa pic.twitter.com/n5cesCB8zQ— पिंपरी चिंचवड पोलीस – Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) October 26, 2020