MNS Gudi Padwa Melava| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा मेळावा होत असल्याने ते कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून मनसे महायुती दाखल होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा झाली नसल्याने आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनसे गुढीपाडवा मेळावा टीझर MNS Gudi Padwa Melava|
मनसेने गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ टीझर शेअर करण्यात आला होता. गेल्या काही दिवसात आपल्या पक्षाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे बघत होतो. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, काय घडवलं जातंय, हे सांगण्याची वेळ आली आहे, असं राज ठाकरे यांनी या टीझर व्हिडीओमध्ये म्हटले होते. तेव्हापासून मनसेच्या या गुढीपाडवा मेळाव्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.
मनसे मेळाव्यात कशी असणार पोलीस सुरक्षा ? MNS Gudi Padwa Melava|
शिवाजी पार्क मैदानात आज 300 पोलीस शिपाई आणि 35 पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी असणार आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी एक विशेष पथक असणार आहे. मनसे कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमध्ये येण्यास कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मनसेचे 100 सुरक्षा रक्षक असणार आहेत. ते वाहतुकीसाठी मदत करणार आहेत. सभेच्या ठिकाणी 500 स्वयंसेवक आणि 100 वॉर्डन सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा: