BMC Election 2025 | मुंबईतील सर्व २२७ प्रभागांसाठीची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर 2025 रोजी काढण्यात येणार असल्याचं अधिकृतपणे जाहीर झालं आहे. या सोडतीनंतर कोणत्या प्रभागांवर महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच सामान्य प्रवर्गासाठी जागा राखीव राहतील, हे स्पष्ट होईल. याचदरम्यान आता मनसेकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अनिश्चितता कायम असल्याने मनसेकडून मुंबईत स्वबळाची तयारी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मनसेकडून २२७ जागांपैकी १२५ जागांची तयारी करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. संभाव्य उमेदवारांची यादी तयार महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने मुंबईतील सर्व प्रभागांचा सखोल अभ्यास पूर्ण केला आहे. याच पार्श्वभूमीवर, निवडणुकीपूर्व तयारीसाठी मनसेकडून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांनाही आता अधिक वेग आला आहे. ठाकरे-मनसे युती झाली, तर मुंबईतील मराठी मतदारसंघांमध्ये समीकरणं बदलू शकतात, असा अंदाजही वर्तवला जात आहे. भाजपही सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज तर दुसरीकडे, भाजप आगामी निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी सज्ज आहेत. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईत भाजप आणि संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली असल्याचे म्हंटले जात आहे. BMC Election 2025 | तर मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आघाडीत न लढता स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. BMC Election 2025 | हेही वाचा : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा ; राज्यातील शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ सक्तीचे करणार