MNS Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) (MNS Politics) एक मोठी घडामोड घडली आहे. रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या पाटील यांच्या राजीनाम्याने मनसे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पाटील यांना पक्षातील उच्चपदस्थांनी राजीनामा (MNS Politics) देण्यास भाग पाडल्याची चर्चा जोरात आहे. राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजीनाम्यानंतर विविध माध्यमांनी जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मराठी माणसांसाठी लढणारे नेते जितेंद्र पाटील हे रायगड जिल्ह्यातील आक्रमक आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. मराठी माणसांवर कुठेही अन्याय झाला की ते तेथे धावून जायचे आणि न्याय मिळवून देण्याचे काम करायचे. त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार अनेकदा रास्ता रोको आंदोलने केली आणि कामगार व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर (MNS Politics) लढा दिला. MNS Politics विशेष म्हणजे, ते रेल्वे कामगार युनियनचे प्रमुख आहेत. या पदावर असताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय मानले जाते. पक्षश्रेष्ठींकडून राजीनामा देण्याचे निर्देश? गेल्या काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींकडून जितेंद्र पाटील यांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या मागील कारणे अद्याप उघड झालेली नाहीत. काहींना असे वाटते की, पक्षातील अंतर्गत गणित किंवा काही घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.