MNS Candidate List BMC Election 2026 | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी केली आहे. मनसेकडून आतापर्यंत 37 जणांचा उमेदवारी अर्ज देण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज (30 डिसेंबर 2025) संपत असताना मनसेने ही यादी प्रसिद्ध केली आहे. मनसेच्या या यादीत विविध भागांतील जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मनसेकडून स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या माध्यमातून मुंबईत ‘मराठी अस्मिता’चा मुद्दा पुन्हा जोर धरताना दिसत आहे. MNS Candidate List BMC Election 2026 | मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी- 1. वार्ड क्र. ८ – कस्तुरी रोहेकर 2. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील 3. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने 4. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे 5. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी 6. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा 7. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर 8. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके 9. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे 10. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव 11. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी 12. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई 13. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख 14. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी 15. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते 16. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे 17. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी 18. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ 19. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज 20. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते 21. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव 22. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली 23. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे 24. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे 25. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे 26. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके 27. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार 28. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी 29. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी 30. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन 31. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर 32. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव 33. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर 34. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक 35. वार्ड क्र. ३६ – प्रशांत महाडिक 36. वार्ड क्र. २१६ – राजश्री नागरे 37. वार्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी मनसेने गेल्या काही दिवसांत मुंबईत मराठी अस्मिता, स्थानिक मुद्दे आणि विकासाच्या आश्वासनांवर भर देत प्रचाराला जोर दिला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे यंदा मुंबई महापालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. BMC निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आज संपत असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. MNS Candidate List BMC Election 2026 | हेही वाचा: बेस्ट बस गर्दीत शिरली अन् १३ जणांना चिरडले; चार जणांचा मृत्यू, नेमका कशामुळे घडला अपघात?