मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसेने ५३ जागांवर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. ही यादी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोबतच्या युती अंतर्गत आहे. यामुळे ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद भाजप-शिंदे गटला कडवी टक्कर देणार आहे. या युतीमध्ये एकूण 227 जागांपैकी मनसे 53 जागा लढवणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट 163 जागा लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही 11 जागा देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेसाठी राज ठाकरेंनी निवडक आणि प्रभावशाली नेत्यांना संधी दिली आहे. यामध्ये यशवंत किल्लेदार, कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांचा समावेश आहे. याशिवाय पहिल्या यादीत अमराठी उमेदवारांना संधी देऊन मनसेने समावेशक दृष्टिकोन दाखवला आहे. मनसेच्या उमेदवारांची यादी वार्ड क्र. ८ – कस्तुरी रोहेकर वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026 मतदान- 15 जानेवारी 2026 मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026 2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक शिवसेना- 84 भाजपा- 82 काँग्रेस- 31 राष्ट्रवादी काँग्रेस- 9 मनसे- 7 समाजवादी पक्ष- 6 एमआयएम- 2 अपक्ष- 5