आमदारांचं टेन्शन वाढलं ; देवेंद्र फडणवीस म्हणाले,” जिंकून येणाऱ्यालाच…”

Bjp MLA Meeting । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा बैठकांवर जोर लागल्याचे दिसत आहे. त्यातच सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेच्या विजयाचा कानमंत्र दिला आहे. एवढंच नाही तर जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचे टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा Bjp MLA Meeting ।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असे आश्वासनही त्यांनी आमदारांना दिले. लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबच फडणवीसांनी चर्चा केली आहे. “‘लाडकी बहिण’, ‘युवा प्रशिक्षण’ या योजना प्रत्येक गावात पोहोचवा. महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा” अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बैठकीला कोण कोणते आमदार उपस्थित? Bjp MLA Meeting ।
देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार राम सातपुते, भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार आश्विनी जगताप, पुणे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनिल कांबळे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर, पर्वती विधनसेभेच्या आमदार माधुरी मिसाळ, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, उत्तर सोलापूरचे आमदार विजय देशमुख आणि सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते.
हेही वाचा
‘महिलांचा समावेश…’ ; वक्फ विधेयकावर मुस्लिम संघटना संतप्त, जाणून घ्या कोण काय बोलले ?





