पुणे जिल्हा | जखमी परप्रांतीयांसाठी आमदार कुल धावले

पारगाव, (वार्ताहर)- आरोग्यदूत आमदार म्हणून ओळख असलेले आमदार राहुल कुल यांनी (दि.२३) प्रवास करीत असताना भांडगाव येथे दुचाकी अपघातग्रस्त परप्रांतीयांना तातडीची मदत करून त्यांना ससून रुग्णालयात पोहोच करण्याची व्यवस्था केली. आरोग्यदूत आमदार कुल यांचा पुन्हा दौंड तालुक्याला प्रचिती आली आहे.
भांडगाव येथे दुचाकीवरून जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांचा अपघात झाला होता. त्यावेळी त्याठिकाणी थांबून आमदार राहुल कुल यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केली. त्यांना रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी यवत येथे ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुणे येथे ससून शासकीय रुग्णालयात पाठवले. संबंधित डॉक्टर्सना तातडीने उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या.
कुल यांच्या गाडीवरील चालक आणि बॉडीगार्ड यांना सूचना करून ठेवल्या आहेत. रस्त्यात एखादा अपघात झालेला दिसला तर लगेच गाडी थांबवा. जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यास मदत करा, अशा सूचना कुल यांनी केल्या आहेत. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. दत्त रुग्णवाहिका सेवा यवत व संदीप दोरगे यांचे देखील आमदार राहुल कुल यांनी आभार मानले.





