जामखेड : विधानसभेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात बोलताना जामखेडचा बदनामीकारक उल्लेख केला होता. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी तातडीने तालुका अध्यक्षांना विनंती करून संबंधित बदनामीकारक उल्लेख रेकॉर्डवरून काढण्याची विनंती केली आणि ती विनंती अध्यक्ष महोदयांनी मान्य केली. रोहित पवार म्हणाले, कर्जत जामखेड ही पुण्यभूमी असून इथल्या मातीची बदनामी कोणीही केली तरी ती कदापि सहन केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी रोहित पवार यांनी दिला.