पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे सोमवारी (दि. २८ अॉक्टो.) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवाजीनगर भाजपचे निवडणूक प्रमुख दत्तात्रय खाडे यांनी ही माहिती दिली. “चला, कमळ फुलवूया ..विकास घडवूया! विजयाची कास धरूया..चला फॉर्म भरुया!’ असा नारा देत पदयात्रेद्वारे ते अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर गावठाणातील श्री रोकडोबाचे दर्शन घेऊन मंदिरापासून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. यामध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआयचे पक्षनेते सहभागी होणार आहेत. श्री रोकडोबा मंदिरापासून आमराळे दवाखना, शिरोळे गल्ली, गणपती चौक, मॉडर्न शाळा, श्री जंगली महाराज मंदिर, बालगंधर्व चौक मार्गे घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन असा पदयात्रेचा मार्ग आहे. सांस्कृतिक भवनात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.