पिंपरी | 20-22 जागा सन्मानजनक असतील तर तो त्यांचा प्रश्न – आमदार रोहीत पवार

पिंपरी, (प्रतिनिधी ) – महायुतीमधील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला 20 ते 22 जागा मिळत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
रोहीत पवार यांनी रविवारी (दि.28) पिंपरी चिंचवड शहर दौर्यादरम्यान शहर पदाधिकार्यांची भेट घेत पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
अजित पवार यांच्या महायुतीमधील सत्ता सहभागाबाबत विचारले असता ते म्हणाले की,जेव्हा आपण विचार बदलतो, साहेबांना सोडतो तेव्हा लोकंसुद्धा आपल्या टोपी घालतात, हे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचेे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली असून ते आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेत कायाबात विचारले असता, त्यांनी या कार्यक्रमाला का हजेरी लावली, कशामुळे ते आले इलेक्शन अवघडे जड जाऊ लागले आहे, असे कुठेतरी जाणवायला लागले असेल,या गोष्टी आता आपल्याला कळतील.
मात्र, एक गोष्ट सांगतो, लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी आम्हाला सांगितले होते की, लोकसभा निवडणूक ही आपल्याला मनापासून लढायची आहे, पण विधानसभा जिंकायची आहे, असे सांगत मात्र सोबत कोण येईल कोण नाही याच्यापेक्षा आम्हाला हे माहित आहे की, महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार येणार म्हणजे येणार, असा विश्वास रोहीत पवार यांनी यावेळी व्यक्त केला.





