MLA Manoj Ghorpade: निरोगी आरोग्यासाठी योगसाधना गरजेची; आमदार मनोज घोरपडेंचे प्रतिपादन
MLA Manoj Ghorpade: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन; सातारा भाजप आणि विविध संस्थांच्या मान्यवरांची शिबिराला उपस्थिती.

MLA Manoj Ghorpade – निरोगी आरोग्यासाठी योगसाधना गरजेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी योग हाच खरा मार्ग आहे, असे मत आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साजर्या होणार्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप महिला मोर्चा आणि सातारा हिल रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाच्या खालील जागेत योगसाधना शिबिर झाले.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. घोरपडे बोलत होते. या शिबिरात शेकडो नागरिकांनी योगाभ्यास केला. रोज थोडा वेळ योगसाधना करून आपले आरोग्य उत्तम ठेवा, असा संदेश जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. प्रिया शिंदे यांनी दिला याप्रसंगी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे, स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्ष समता घोरपडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, योग दिन संयोजक गणेश जाधव, सातारा पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे,
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, नगरसेविका रिना भणगे, रवी पवार, सातारा बाह्य मंडलाध्यक्ष वैशाली टंगसाळे, वैष्णवी कदम, योग प्रशिक्षक कुंजा खंदारे, सरचिटणीस विक्रम बोराटे, अक्षय भोसले व मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या प्रारंभी योगाचे महत्त्व, इतिहास व निरोगी जीवनासाठी योगाची उपयुक्तता याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर सातारा हिल रनर्सचे संस्थापक डॉ. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव करून घेण्यात आला. डॉ. पवार यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक फायदे विशद केले. सौ. मनीषा घार्गे, सौ. स्वाती ढाणे आणि डॉ. नीलिमा पवार यांनी योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.





