MLA Manoj Ghorpade – पुनर्वसित गावांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. भांबे, ता. कराड येथे आ. मनोज घोरपडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मदन काळभोर, रणजीत जाधव पाल गटाचे नेते सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य धैरजा माने, रणजित पाटील, प्रकाश काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. मनोज घोरपडे म्हणाले, भांबे हे पुनर्वसित गाव असून छोटेसे गाव आहे. तरीसुद्धा या गावांमध्ये जवळपास 1 कोटी 35 लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत. भांब्याप्रमाणेच कराड उत्तर मध्ये 35 पुनर्वसित गावी आहेत. 35 ते 40 वर्षे ही गावे पुनर्वसित असून आजपर्यंत त्यांना भौतिक सुविधा मिळाल्या नाहीत. येणाऱ्या वर्षांमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणूनपुनर्वसित गावांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सुरेश पाटील, संदीप काटे, हनुमंत काटे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी दिगंबर बिसे, अनिल माने, अशोक पाटील, हणमंत काटे, प्रकाश काटे, सरस्वती गुरव, सरपंच दादासो काटे, संदीप काटे, सुभाष काटे, अंकुश काटे, सचिन काटे, जयशिंग काटे, अक्षय यादव, आबाजी काटे, चंद्रकांत काटे, दत्तात्रय काटे, विलास काटे, गणेश काटे, महेश काटे, सुनील काळभोर, सतीश शिंदे, संतोष यादव, नवनाथ मोरे, लक्ष्मण मोरे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.