MLA Disqualification : अध्यक्षांचा दुसरा धक्का, ‘शिंदेंना पदावरून काढण्याचा हक्क ठाकरेंना….’

Updated On:

MLA Disqualification : महाराष्ट्रात तब्बल दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपाचे कंप आजही राज्याच्या राजकीय वर्तुळात कायम आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. याबाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत.

अध्यक्ष नार्वेकर ठाकरे विरुद्ध शिंदे प्रकरणाचा निर्णय वाचून दाखवत आहेत. उद्धव ठाकरे गटाने सादर केलेले पक्षाचे संविधान अमान्य असल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांना पाहिला धक्का दिला होता.

यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी, पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) यांच्या एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढण्याचा निर्णय अमान्य केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत, असं निरीक्षण नोंदवलं आहे.

हा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीकडे राहील असं निरीक्षण नार्वेकर यांनी शिवसेनेच्या घटनेचा दाखला देत म्हंटलंय. शिवसेनेच्या घटनेनुसार असा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख ठाकरेंना नाही असे नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन