पुणे जिल्हा | आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला शब्बीरभाई काजी यांचा सन्मान

इंदापूर, (प्रतिनिधी) – राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीयेथे सणसर येथील शब्बीरभाई काझी हे आपल्या कुटुंबासोबत मुस्लिम बांधवांचे पवित्र स्थान मक्का मदिना (उमराह)साठी जाऊन आल्यानंतर शब्बीरभाई काजी यांचा सन्मान आमदार भरणे यांनी केला.
यावेळी इकबाल शेख, राजूभाई पठाण, इन्नूस शेख, अफाक मुलाणी, हमीद तांबोळी, हमीद शेख, इन्नूस शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छा देताना आमदार भरणे म्हणाले, मुस्लिम धर्मियांचे मक्का मदीना हे पवित्र स्थान असून, या ठिकाणी प्रत्येक बांधव जीवन आनंदी, जगण्यासाठी जात असतात.
सौदी अरेबीया मध्ये हे स्थान असून, इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान आहे. अशा पवित्र स्थानाला आपल्या तालुक्यातील मुस्लिम बांधव सातत्याने दर्शनासाठी जातात. त्यांना कायम शुभेच्छा तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.





