थांब रे शांत बस…बच्चू कडूंनी पोलिसांसमोर व्यक्तीच्या कानशिलात लगावली

अमरावती – आमदार बच्चू कडू सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कायम आक्रमक पवित्रा घेतात. अपंगांचे प्रश्न असोत किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या बच्चू कडू नेहमीच जबाबदारीने कर्तव्य बजावताना दिसतात. अन्यायाविरोधात आवाज उठवताना बच्चू कडू अनेकदा अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरताना दिसतात. सध्या बच्चू कडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये बच्चू कडू चांगलेच चिडलेले पाहायला मिळतात.
अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील हा व्हिडीओ असलयाचे समजते. ज्यात आमदार कडू एका व्यक्तीला ऐकून घे,आधी शांत बस असं म्हणत थेट कानशिलात लगावतात. विशेष म्हणजे यावेळी समोर कॅमेऱ्यासह पोलिसही उपस्थित असलयाचे दिसते. गावातील विकासकामांवरून यावेळी हुज्जत झाल्याचे समजते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. बच्चू कडू उपस्थितावर नेमकं का भडकले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.हा त्यांचाच कार्यकर्ता होता अशी चर्चा मीडियामध्ये सुरु होती मात्र एका वाहिनीला माहिती देत ती व्यक्ती स्थानिक नागरिक असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.





