आमदार अभिमन्यू पवार करणार प्लाझ्मादान
Updated On:

लातूर – भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. दहा दिवसांपूर्वी त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होता. तसेच, त्यांचा पुत्र परिक्षीत यालाही करोनाचा संसर्ग झाला होता.
अभिमन्यू पवार आणि त्यांच्या मुलगा करोनातून बरा झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिमन्यू पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्लाझ्मादान करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला. तसेच, उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या लोकांनाही प्लाझ्मादान करण्याचे आवाहन केले आहे.





