मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळली ; दहा जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Mizoram Stone Quarry Collapse । मिझोराममधील दगडाच्या खाणीत आज सकाळी भीषण अपघात झाला. राज्यातील ऐझॉल जिल्ह्यात दगडाची खाण कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय.
मिझोरम पोलिसांनी घटनेविषयी माहिती दिली. त्यानुसार,”ही घटना सकाळी ६ वाजताच्या सुमारास आयझॉलच्या दक्षिणेकडील सीमेवर असलेल्या मेल्थम आणि हलीमेन दरम्यानच्या भागात घडली. आज सकाळपासून परिसरात संततधार पाऊस सुरू असताना हा अपघात झाला.
पावसामुळे बचाव कार्यात अडथळा Mizoram Stone Quarry Collapse ।
डीजीपी अनिल शुक्ला यांनी, “आता पर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत असला तरी बचावकार्य सतत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
10 people dead, several others missing as stone quarry collapses in Mizoram’s Aizawl amid incessant rains: DGP Anil Shukla to PTI
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2024
मिझोराममध्ये भूस्खलन Mizoram Stone Quarry Collapse ।
अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना, “पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. ते म्हणाले की, हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग 6 वर भूस्खलन झाल्यामुळे आयझॉल देशाच्या इतर भागापासून वेगळे झाले आहे.”असे सांगितले. याशिवाय अनेक राज्यांतर्गत महामार्गही भूस्खलनामुळे विस्कळीत झाले आहेत.
राज्यात पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. तरी पुढेच काही तास नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.





