Amol Mitkari : नीट पेपरफुटीप्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आले असून त्यांना सीबीआयने अटक केली आहे. पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या अटकेनंतर पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. खरंतर शिवराज मोटेगावर यांचा मोठा दबदबा होता, पण त्यांनाचा नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आल्याने विविध प्रश्न विचारले जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरींनी पोस्टद्वारे मोटेगावकर खाजगी शिकवणी क्लासेसचा संचालक जर इतका भामटेगिरी करून पालकांचं इतक्या वर्षांपासून आर्थिक शोषण करत होता तर विचार करा आज प्रत्येक शहरात एक मोटेगावकर आहे, असे म्हटले आहे. तसेच दिपक केसरकर शिक्षण मंत्री असताना अनेकवेळा हा गंभीर विषय अमोल मिटकरींनी सभागृहात मांडला मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? मोटेगावकर खाजगी शिकवणी क्लासेसचा संचालक जर इतका भामटेगिरी करून पालकांचं इतक्या वर्षांपासून आर्थिक शोषण करत होता तर विचार करा आज प्रत्येक शहरात एक मोटेगावकर आहे. यांच्या खाजगी शिकवणीवर जर सरकारने नियंत्रण समिती बसवली असती तर आज Neet च्या परीक्षा मेहनतीने देणाऱ्या विद्यार्थ्यावर जीव द्यायची वेळ आली नसती. दिपक केसरकर साहेब शिक्षण मंत्री असताना अनेकवेळा हा गंभीर विषय मी सभागृहात मांडला मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज या प्रकरणावरून जबाबदारी झटकून चालणार नाही. ही लढाई धनदांडग्यांविरुद्ध आहे जी आपल्या सर्वांना लढावीच लागेल ,पुढच्या पिढीसाठी मोटेगावकर खाजगी शिकवणी क्लासेसचा संचालक जर इतका भामटेगिरी करून पालकांचं इतक्या वर्षांपासून आर्थिक शोषण करत होता तर विचार करा आज प्रत्येक शहरात एक मोटेगावकर आहे.यांच्या खाजगी शिकवणीवर जर सरकारने नियंत्रण समिती बसवली असती तर आज Neet च्या परीक्षा मेहनतीने देणाऱ्या विद्यार्थ्यावर जीव… — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 18, 2026 मिळालेल्या माहितीनुसार, NEET-UG पेपर लीक प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर हा आकडा 10 वर पोहोचला असल्याचे CBI ने सांगितले आहे. शिवराज मोटेगावकरला कोर्टाने 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. CBIने कोर्टात डेटा डिलीट केल्याचा आणि इतर आरोपींशी संबंध असल्याचा युक्तिवाद केल्यानंतर ही कोठडी मंजूर करण्यात आली. या प्रकरणात आता कोणतं मोठं नाव समोर येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हेही वाचा : Ram Charan: ‘पेद्दी’मुळे राम चरण भावूक; सलमान आणि आमिर खानचे मानले आभार