बॉलीवूडमधील स्टार्स किड्सविषयी सतत चर्चा होत असते. दरम्यान अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिथी चक्रवर्तीने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आहे. त्याच्या पहिल्या “बॅड बॉय’ चित्रपटाचे पोस्टर सलमान खानने शेअर केले आहे. केवळ मिथुन चक्रवर्तीचा मुलगाच नव्हे तर त्याची मुलगी दिशानी चक्रवर्ती देखील बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे.
सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे दिशानी कायम चर्चेत राहिली आहे. तिचे फोटो पाहता ती खूपच सुंदर आणि स्टाइलिश असलेली दिशाना बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी तयार असल्याचे दिसते.
दिशानी चक्रवर्ती सौंदर्य दृष्टीने बॉलीवूडमधील अभिनेत्रींना टक्कर देवू शकते. काही दिवसांपूर्वीच तिने केलेले शानदार फोटोशूट चाहत्यांना खूपच आवडले होते. यावरून चाहत्यांनी ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार असल्याच्या कमेंट केल्या होत्या.
दिशानी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून तिचे फोटो सतत व्हायरल होत असतात. दिशानीला मिथुनने दत्तक घेतली असते तरी ते तिच्यावर आपल्या मुलीवर खूप प्रेम करतात. दिशानी तिच्या सोशल अकाऊंटवरुनही आपल्या वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करत असते.
दरम्यान, दिशानी सध्या न्यूयॉर्क फिल्म ऍकॅडमीमधून ऍक्टिंगचा कोर्स करत आहे. दिशानीने अद्याप चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेला नाही. परंतु तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. हा छंद तिच्या स्टाईलिश फोटोंमधूनही दिसून येतो.