Mitali Express : बांगलादेशातून मिताली एक्सप्रेस 5 महिन्यानंतर भारतात परतली

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका आणि भारतातील जलपायगुडीदरम्यान धावणाऱी मिताली एक्सप्रेस तब्बल 5 महिन्यानंतर भारतात परतली आहे. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे ही रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली होती.
कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आज सकाळी पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील चिलाहाटी-हल्दीबारी सीमेवरून ही रेल्वे पुन्हा भारतात आली. असे बांगलादेश रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी मिताली एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीहून ढाक्यासाठी निघाली होती. परंतु बांगलादेशातील राजकीय अशांततेमुळे ती परत येऊ शकली नव्हती.
बांगलादेशातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता, भारतीय रेल्वेने तिन्ही देशांतर्गत प्रवासी गाड्या अनिश्चित काळासाठी निलंबित केल्या आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बांगलादेशचा दौरा केल्यानंतर ही रेल्वे मायदेशी येऊ शकली आहे.





