Mitchell Marsh Fastest Century for LSG IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील ५० व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या मिचेल मार्शने आपल्या फलंदाजीने आरसीबीच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना मार्शने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टी-२० क्रिकेटमधील हे त्याचे पाचवे आणि आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले आहे. या खेळीसह त्याने लखनौ सुपर जायंट्सच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. ऋषभ पंतचा विक्रम मोडला – मिचेल मार्श आता लखनौ सुपर जायंट्ससाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम लखनैचा कर्णधार ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने २०२५ मध्ये आरसीबीविरुद्ध ५४ चेंडूत शतक ठोकले होते. मार्शने ४९ चेंडूत ही किमया साधत आपल्या कर्णधाराला मागे टाकले आहे. याशिवाय केएल राहुलने यापूर्वी ६० चेंडूत शतक झळकावले होते. मार्शच्या या खेळीत ९ चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. यंदाच्या हंगामातील ठरले १० वे शतक – Innings Break! A magnificent hundred from Mitchell Marsh, followed by a fiery finish propel #LSG to a big total 👏 Scorecard ▶️ https://t.co/W0eDq9aWb7#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRCB pic.twitter.com/xmKYJThdZR — IndianPremierLeague (@IPL) May 7, 2026 आयपीएल २०२६ मध्ये शतक झळकावणारा मिचेल मार्श हा १० वा फलंदाज ठरला आहे. या हंगामात लखनौकडून शतक झळकावणारा तो पहिलाच खेळाडू आहे. यंदाच्या मोसमात संजू सॅमसनने सर्वाधिक दोन शतके झळकावली आहेत, तर राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने हैदराबादविरुद्ध ३६ चेंडूत शतक झळकावून सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावे ठेवला आहे. मार्शच्या शतकामुळे या यादीत आता लखनौचे नावही जोडले गेले आहे. हेही वाचा – Bhuvneshwar Kumar Record : भुवनेश्वर कुमारचा ऐतिहासिक पराक्रम! IPL इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच वेगवान गोलंदाज मार्शची झुंज, पण लखनौची स्थिती नाजूक – मिचेल मार्श हा यंदाच्या हंगामात लखनौसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असला तरी, संघाची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. मार्शने १० सामन्यांत ३६० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, या सामन्यापूर्वी लखनौने खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ७ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. मार्श आणि अर्शिन कुलकर्णी यांच्यातील ९५ धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे लखनऊने आज आरसीबीसमोर २१० धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे.