एमआयटी क्रीडा स्पर्धेस आजपासून प्रारंभ
Updated On:

पुणे – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे 15 वी राष्ट्रीय पातळीवरील आंतर-अभियांत्रिकी क्रीडा स्पर्धा शुक्रवारपासून आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन भारताची महिला क्रिकेटपटू पूनम राऊतच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वशांती विद्यापीठीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या समारंभासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. कृष्णप्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू चंद्रकांत बोर्डे उपस्थित राहणार आहेत.
टॅग्स:





