देशात ‘मिशन मोसम’ लॉन्च ; पंतप्रधान म्हणाले,”आता भारत हवामानासंदर्भात ‘स्मार्ट राष्ट्र’ बनू शकेल”

Mission Mausam । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) १५० व्या स्थापना दिनानिमित्त ‘मिशन मौसम’ लाँच केले. देशाला प्रत्येक हवामान आणि जलसंकटाचा सामना करण्यासाठी ‘स्मार्ट राष्ट्र’ बनवणे हा याचा ज्याचा उद्देश आहे. राष्ट्रीय राजधानीतभारत मंडपम येथे झालेल्या समारंभात पंतप्रधानांनी मिशन मोसमचे अनावरण केले. यावेळी पंतप्रधानांनी आयएमडीच्या १५० व्या स्थापना दिनानिमित्त एक स्मारक नाणे, हवामानशास्त्रीय लवचिकता आणि हवामान बदल अनुकूलनासाठी आयएमडी व्हिजन-२०४७ दस्तऐवजाचे प्रकाशनदेखील केले.
पंतप्रधानांनी भारत मंडपम याठिकाणी आयएमडीच्या कामगिरीवर आधारित प्रदर्शनालाही भेट दिली. यामध्ये हवामान अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदल कमी करण्याच्या योजनांचा समावेश आहे.
नवीनतेच्या स्वरूपाचा एक भाग Mission Mausam ।
भारतीय हवामान खात्याच्या १५० व्या स्थापना दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “कोणत्याही देशातील वैज्ञानिक संस्थांची प्रगती ही विज्ञानाबद्दलची त्यांची जाणीव दर्शवते. वैज्ञानिक संस्थांमध्ये संशोधन आणि नवोपक्रम हे नवीनतेच्या स्वरूपाचा एक भाग आहे.” भारतात गेल्या १० वर्षांत आयएमडीच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचाही अभूतपूर्व विकास झाला आहे. म्हणून आम्ही ‘मिशन मोसम’ देखील सुरू केले आहे. जेणेकरून भारत भविष्यात प्रत्येक हवामान परिस्थितीसाठी तयार राहू शकेल आणि भारत एक हवामान स्मार्ट राष्ट्र बनू शकेल.”असे त्यांनी म्हटले.
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भारतीय मौसम विज्ञान विभाग के 150वें स्थापना दिवस के समारोह में भाग लिया और ‘मिशन मौसम’ का शुभारंभ किया। pic.twitter.com/bERUSKoux9
— ANI_HindiNews (@AHindinews) January 14, 2025
ते पुढे म्हणाले, “हवामानशास्त्र हा कोणत्याही देशाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी, आपल्याला हवामानशास्त्राची कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढवणे आवश्यक आहे. भारताने सातत्याने त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.” ज्या आपत्तींना पूर्वी नशीब म्हणून दुर्लक्षित केले गेले होते त्यांची दिशा आज आपण बदलण्यात यशस्वी होत आहोत.” असे त्यांनी म्हटले.
शेती, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण यासह अनेक क्षेत्रात फायदे Mission Mausam ।
दोन वर्षांत २००० कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रामुख्याने भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राद्वारे राबविला जाईल. मिशन मौसमचा कृषी, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण, विमान वाहतूक, जलसंपदा, वीज, पर्यटन, नौवहन, वाहतूक, ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रांना थेट फायदा होईल. याव्यतिरिक्त, ते शहरी नियोजन, रस्ते आणि रेल्वे वाहतूक आणि पर्यावरणीय देखरेख यासारख्या क्षेत्रात डेटा-आधारित निर्णय घेण्यास देखील वाढवेल.





