पुणे – तळजाई वसाहतीत वाटलेल्या शिधा किटमधून उरलेले 134 किट चोरीला गेले होते. ते एका रात्रीत पुन्हा विणकर सभागृहात आणून ठेवण्यात आले आहे. येथूनच हे किट महापालिका अधिकाऱ्यांना कल्पना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात ठेवण्यात आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा गोंधळ झाला. पोलिसांत ही तक्रार गेल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दि.20 आणि 24 मे रोजी तळजाई वसाहतीमध्ये या किटचे वाटप केल्यानंतर उरलेले 134 किट विणकर सभागृह येथे ठेवण्यात आले होते. हे किट चोरीला गेल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात दोन दिवस पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.