Jammu Kashmir : मिस वर्ल्ड कॅरोलिना काश्मीर दौऱ्यावर…

श्रीनगर :- मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का सोमवारी एका कार्यक्रमासाठी काश्मीर दौऱ्यावर आल्या. त्यांच्या समवेत मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टीसह पोलंडच्या बिएलॉस्का आणि इतर प्रतिष्ठितांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने न्याहारीचा आनंद लुटला.
रुबल नागी आर्ट फाउंडेशनचे रुबल नागी आणि भारतातील पीएमई एंटरटेनमेंटचे अध्यक्ष जमील सैदी हे देखील यावेळी उपस्थित होते. या वर्षाच्या अखेरीस भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा होणार आहेत.
कॅरोलिना यांची ही पहिली काश्मीर भेट आहे. भारतीय युवतींनी सहा वेळा मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून जवळपास तीन दशकांनंतर या स्पर्धेचे भारत आयोजन करत आहे.
भारताने या आधी 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. कॅरोलिना यांनी या दिवसभराच्या धावपळीच्या भेटीत काश्मिरातील काही पर्यटन स्थळांनाही भेट दिली.



