कोल्हापूर : कोल्हापूर ते मिरज दरम्यान इलेक्ट्रिक लोकोमोटिव चाचणी आज रोजी करण्यात आली. तसा हा मिरजसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. 1891 मध्ये पीओपी (कोळसा इंजन) प्रथम मिरजमध्ये आले होते. त्यानंतर 1971 साली डिझेल इंजिन मिरज स्थानकामध्ये आले. आज 2019मध्ये इलेक्ट्रिक इंजिन मिरजमध्ये दाखल झालेला आहे.
पुणे-मिरज लोंढा दरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असून यासाठी रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्था यांनी पाठपुरवठा केला होता. या कामाला आज खरे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावेळी मिरजमध्ये आलेल्या लोकोमोटिव इंजिनाचे रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्था यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले.
कोल्हापुर येथुन दु.2:36 वा निघालेली इलेक्ट्रिक इंजन 40 मिनिटांत मिरज येथे पोहचले. ताशी 100 कि.मी.च्या वेगाने हे इंजन धावले. संध्याकाळी 5 वा. हे इंजन ढालगावकडे रवाना झाले. कोल्हापुर-मिरज- कुर्डुवाडी या मार्गाचे काम मार्च 2020पर्यंत पूर्ण करुन या मार्गावर इलेक्ट्रिक इंजनसहीत गाडी धावेल, अशी माहीती मध्य रेल्वे पुणे विभागीय वाहतुक निरिक्षक विवेक पोतदार यांनी दिली.