‘या’ कारणामुळे मोठी ऑफर नाकारली; मीरा राजपूतने केला खुलासा, म्हणाली “मांसाहार करणं…”

Meera Rajput : अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे बॅालीवडूमधील एक सुंदर कपल म्हणून ओळखली जातात. मीरा राजपूत हि तिच्या स्पष्ट विचारांसाठी ओळखली जाते. ती नेहमी तिची जीवनशैली आणि आहाराबद्दल उघडपणे आपली मतं मांडत असते. ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. तिने अनेक सौंदर्य आणि लाइफ उत्पादने देखील लाँन्च केली आहेत. मात्र, सध्या ती एका विधानाने चर्चेत आहे. मीराने एका फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती शाहाकारी असून आहाराबाबत खूप काळजी घेत असल्याचे तिने सांगितले. तसेच तिला कोणी नॅानव्हेज रेस्टॅारंटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले तर ती नाकार देईल, असे स्पष्ट मतं तिने मांडले आहे.
ती अंडी किंवा नॉनव्हेज पदार्थ खात नाही. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये गुंतवणूक करण्यास कोणी सांगितलं, तरी ती तसे करणार नाही. कारण ते तिच्या तत्वाला तडजोड करण बसत नसल्याचे तिन सांगितले. लोकांच्या नजरेत तुमाच्याबद्दल अनेक मतं असतात, त्यामुळे आपण फक्त स्वतःचा आवाज ऐकला पाहिजे. लोकं काहीही बोलू शकतात, पण हे आपल्याला कसे हाताळता येईल हे आपल्याला ठरवायचं असल्याचे स्पष्ट मत तिने यावेळी बोलताना व्यक्त केले.
एकदा एक व्यक्ती माझ्याकडे रेस्टॉरंट व्यवसायासाठी आली होती. मी त्यांना सांगितलं की, मी शाकाहारी आहे आणि मद्यपान करत नाही. त्यामुळे मी अशा व्यवसायात गुंतवणूक करू शकत नाही. पण मी तुम्हाला शुभेच्छा देते, असे स्पष्ट तिने त्या व्यक्तीला सांगितले होते, अशी आठवण तिने यावेळी बोलताना सांगितली. शाहिद आणि मीरा यांनी २०१५ मध्ये विवाह केला. त्यांना दोन मुलं आहेत.





