Amravati Ayan Tanveer Case : नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात प्रकरणानंतर एकामागून एक धक्कादायक लैंगिक शोषणाचे आणि धर्मांतराची प्रकरणे समोर असून यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता अमरावती येथील लैंगिक शोषण प्रकरणाने वेगळं वळण घेतले आहे. या प्रकरणी माजी खासदार नवनीत राणा यांनी हिंदू मुलींचे शोषण झाल्याचा दावा केला होता, मात्र आता राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पत्रकार परिषद घेत नवनीत राणांचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “नवनीत राणांनी चुकीची माहिती पसरवू नये, अफवा पसरवून दंगल भडकवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे,” असा आरोप राणांवर प्यारे खान यांनी केला आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी मुस्लिम असल्याचे खान यांनी सांगितले. परतवाडा इथे एका प्रकरणावरून नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेत हिंदू मुलींच्या शोषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. (Amravati Ayan Tanveer Case) प्यारे खान यांचा दावा या प्रकरणातील विविध मुद्यांवर प्यारे खान यांनी पत्रकार परिषदेत दावा करत 8 पीडित मुली या मुस्लिम असल्याची माहिती मिळाली आहे. यात एकाही हिंदू मुलीचा समावेश नाही, तरीही त्याला धार्मिक रंग दिला जात आहे. इतकंच नाही तर हे संपूर्ण प्रकरण कोणत्याही लव्ह जिहाद किंवा धार्मिक कटातून नाही, तर दोन मित्रांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणातून समोर आले असल्याचे खान यांनी सांगितले. (Amravati Ayan Tanveer Case) तसेच पत्रकार परिषदेत प्यारे खान यांनी नवनीत राणांवर आरोपांची तोफ डागली. नवनीत राणा या शहरात दंगे भडकवण्याचं काम करत आहेत. तुम्ही हिंदूंना बरबाद करण्याचं काम केलं. पंतप्रधान मोदी, मोहन भागवत देशाला जोडण्यासाठी प्रयत्न करता आहेत आणि तुम्ही देशाला तोडण्याचं काम करत आहात. तुम्हीच पाकिस्तानला निघून जा. या देशात मुस्लीम सुरक्षित आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी अशा बदनामी करणान्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परतवाडा प्रकरणात धर्माचा कोणताही अँगल नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. (Amravati Ayan Tanveer Case) नेमकं प्रकरण काय? अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि ते व्हायरल करण्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर असून या 19 वर्षीय तरुणाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याने सुमारे 180 हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील 350 पेक्षा जास्त व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत मुख्य संशयित आरोपीसह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. हेही वाचा : Hot Water Bath: सर्व ऋतूंमध्ये गरम पाण्याने अंघोळ करताय? जाणून घ्या फायदे-तोटे आणि एक्स्पर्टचा सल्ला