मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर अखेर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे-पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, खाते वाटपाच्या या जबाबदारी नंतर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने या मंत्र्यांचे काही खास फोटो तयार करण्यात आले आहे. कोणत्या मंत्र्याकडे राज्यातील कोणती जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भातील हे फोटो तयार केले आहेत.
अमित वानखेडे यांनी हे फोटो बनवले आहेत. आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने नेत्यांचे हे बनवले आहेत. यामध्ये आतापर्यंत देशाच्या महत्वाच्या व्यक्तींचे फोटो तयार करण्यात आले होते. भाजप, शिंदे गट (शिवसेना), ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे देखील एआय फोटो तयार करण्यात आले होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.