हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आघाडीवर

Lok Sabha Result 2024 Live | तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यातील लढत महत्वपपूर्ण आहे. हैदराबादचा गड माधवी लता जिंकण्यास यशस्वी ठरणार का? याची अनेकांना उत्सुकता लागली होती. काही वेळातच येथील चित्र स्पष्ट होणार आहे.मात्र सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
भाजपच्या माधवी लता यांनी आत्तापर्यंत 1 लाख 14 हजार 35 मत मिळवली आहेत. तर काँग्रेसच्या मोहम्मद समीर यांनी 13 हजार मत मिळवली आहेत. तर असदुद्दीन औवेसी 15 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप उमेदवार डॉ. भगवाननाथ राव यांचा 2 लाख 80 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत ओवेसींना 5 लाख 17 हजार 471 मते मिळाली होती. तर भाजप उमेदवाराला 2 लाख 35 हजार 285 मते मिळाली. त्याचवेळी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती, तर टीआरएस तिसऱ्या क्रमांकावर होती.





