वाघोली -येथील कै. संदीप शिवाजी सातव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील कोविड सेंटरसाठी लाखमोलाची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
मागील वर्षी भावाच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोल्हापूर येथे झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका गरिबाचे घर उभारण्यासाठी माझ्या कुटुंबाने मदत केली होती. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, सामाजिक संस्था तसेच विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.
आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाने कुटुंबात जी पोकळी निर्माण होते, ही पोकळी भरून काढण्यासाठी सातव परिवाराने आज अखेरपर्यंत अनेक उपक्रम राबवून अनेकांना मदत केली आहे. यावर्षी करोनामुक्त परिसर होण्यासाठी कोल्हापूर येथील कोविड सेंटरसाठी लाख-मोलाची आर्थिक मदत करून सातव परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गणेश भेगडे, सुनील कांचन, शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, पुणे जिल्ह्याचे माजी सह पालकमंत्री संजय भेगडे, वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, मंगलदास बांदल, जय प्रकाश सातव, गणेश कुटे आदी मान्यवरांनी सातव परिवाराचे हा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले आहे.