दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बारामती दूध संघाचा बल कुलर पाडला बंद
बारामती- बारामती तालुक्यातील दूध संघाने दुधामध्ये भेसळ असल्याचे सांगून डोरलेवाडीतील बल कुलर युनिटमध्ये दुधाचे चेकिंग सुरू केले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. बारामती दूध संघाकडून नाहक त्रास सुरू असल्याने डोरलेवाडीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संघाचा असलेला बल कुलर बंद पाडला आहे.