वॉशिंग्टन – इराणविरोधात अमेरिकेने सुरू केलेल्या मोठ्या लष्करी मोहिमा आता पुर्ण झाल्या आहेत, अशी महत्वाची घोषणा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केली आहे. हा संघर्ष आता पुन्हा सुरू होऊ शकत नाही, असे मात्र ते म्हणाले नाहीत. अमेरिका आणि इस्रायलने मिळून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ल्याने सुरू केलेले ऑपरेशन एपिक फ्युरीचे उद्दिष्ट साध्य झाले असल्यामुळे आता ही लष्करी मोहिम आता समाप्त झाली आहे, असे रुबिओ यांनी व्हाइट हाउस येथे पत्रकारांना सांगितले. (US Iran war) सध्या होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणबरोबर सुरू असलेला अमेरिकेचा संघर्ष बचावाच्या स्वरुपाचा आहे. अतिरिक्त संघर्षाची परिस्थिती उद्भवू नये, असे आम्हाला वाटत नाही. आम्ही त्याऐवजी शांततेचा मार्ग निवडू असे रुबिओ यांनी सांगितले. अणू कराराबाबत इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत आणि जागतिक पातळीवर तेल आणि गॅसच्या पुरवठ्यासाठी होर्मूझची सामुद्रधुनी खुली केलीच पाहिजे, असे ही ते म्हणाले. (US Iran war) US Iran war : इराणमधील लष्करी कारवाई समाप्त.! अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची घोषणा लष्कराची कारवाई थांबवल्यामुळे आता काय होईल, हे बघावे लागेल. दोन्ही देशांमध्ये महिन्याभरापासून लागू असलेला युद्धविराम पुर्ण झालेला नाही. इराणबरोबरचे युद्ध संपले आहे. पण शांतता अजूनही दृष्टीपथात नाही. होर्मूझची सामुद्रधुनी बंद असल्याचा त्रास अमेरिकेपेक्षा चीनला अधिक होत असावा, त्यामुळे इराणने ही सामुद्रधुनी खुली करणे हे चीनच्या हिताचे आहे. त्यासाठी चिनी अधिकाऱ्यांचे इराणशी बोलणे झाले असावे, असे हेगसेथ यांनी म्हटले आहे. होर्मूझची सामुद्रधुनी खुली व्हावी, यासाठी मदत करायला इतर अनेक देश तयार असले, तरी त्यासाठी फार कमी देशांची क्षमता असल्याचेही रुबिओ म्हणाले. दुसरीकडे इराणकडून यूएईवर अधिक हल्ले केले जात आहेत, असे यूएईने म्हटले आहे. पण अलिकडच्या काही दिवसात यूएईवर हल्ले केले नसल्याचे इराणच्या जॉइंट मिलिटरी कमांडच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. US Iran war प्रोजेक्ट फ्रीडम देखील स्थगित (US Iran war) आज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रिडम देखील स्थगित झाल्याचे जाहीर केले आहे. युद्ध समाप्त करण्यासाठी इराणबरोबरच्या वाटाघाटींमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकून पडलेल्या शेकडो जहाजांना तेथून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने या प्रोजेक्ट फ्रिडम अंतर्गत मार्गदर्शन करण्याचे ठरवले होते. (US Iran war) काल अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांद्वारे केवळ दोन जहाजांना होर्मूझची सामुद्रधुनी ओलांडता आली होती. जहाजांना पर्शियन आखातातून बाहेर काढण्यासाठी शांततामय पर्यायांचा अवलंब करण्यास अमेरिकेचे प्राधान्य आहे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले होते. मात्र आज अचानक हा प्रोजेक्ट फ्रिडम स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करून ट्रम्प यांनी आणखी एक धक्का दिला आहे. इराणच्या प्रतिनिधींसोबत संपूर्ण आणि अंतिम करार करण्याच्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे. नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील, परंतु करार अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करता येते की नाही हे पाहण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम थोड्या कालावधीसाठी थांबवण्यात येणार आहे. तसे आम्ही परस्पर सहमतीने ठरवले आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.