बर्फात शर्ट-लेस पुशअप्स करताना दिसला बॉलिवूड अभिनेता, वयाच्या 59व्या वर्षीही एकदम फिट; व्हीडिओ व्हायरल

Milind Soman Fitness | बॉलीवूड अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या मिलिंदला त्याच्या फिटनेससाठी ओळखले जाते. अभिनेत्याकडून फिटनेससाठी नियमित व्यायाम व आहार याचे काटेकोरपणे पालन केले जाते. अगदी घरी असो अथवा बर्फाच्छादित प्रदेश, मिलिंद वर्कआउट कधीच टाळताना दिसत नाही.
सध्या मिलिंदचा असाच एक वर्कआउट करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 59 वर्षीय अभिनेता बर्फाने वेढलेल्या निसर्गरम्य ठिकाणी तो चक्क टी-शर्टशिवाय वर्कआउट करताना दिसत आहेत.
मिलिंदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नॉर्वेमधील बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये पुशअप्स करताना दिसत आहे. आजुबाजूला बर्फ, प्रचंड थंडी अशा स्थितीमध्येही अभिनेता शर्टलेस पुशअप्स करताना पाहून चाहते देखील चकित झाले. मिलिंदने सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत लिहिले की, ‘ट्रोम्सोमध्ये सकाळी सकाळी पुशअप्स. प्रत्येक दिवसाच्या पहिल्या 5 मिनिटात काही व्यायाम करायला आवडते.’
View this post on Instagram
त्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक मजेशीर कमेंट्स केल्या जात आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुमच्या फिटनेसचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.’ तर आणखी एकाने लिहिले की, ‘मानलं तुमच्या फिटनेसला, जबरदस्त!’
दरम्यान, मिलिंद सोमणने 9 वर्षांच्या वयातच नॅशनल स्विमिंग चॅम्पियन बनण्याची कामगिरी केली होती. पुढे त्याने मॉडेल क्षेत्रातही काम केले. त्याने ‘कटपुतली’ आणि ‘भेजा फ्राय’ या चित्रपटातही काम केले आहे. एका मुलाखतीत मिलिंदने सांगितले होते की तो कधीच जिमला जात नाही. मात्र, अभिनेता नियमित धावणे, घरी व्यायाम व आहार या गोष्टींकडे विशेष देतो.





