मुंबई – मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला. याचे मुख्य कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्याचा फिटनेस.
दरम्यान आता, मिलिंद विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकतंच मिलिंद सोमणने आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.
Case registered against model-actor-fitness promoter Milind Soman, under IPC Sec 294 (Obscene acts and songs) & Sec 67 (Punishment for publishing/transmitting obscene material in electronic form) of IT Act for his social media post where he was seen sprinting naked at a Goa beach pic.twitter.com/MJq3o6y1rz
— ANI (@ANI) November 6, 2020
मिलिंद सोमणनं शेअर केलेल्या या न्यूड फोटो मुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे.” असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात मिलिंद विरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने देखील गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अश्लिल व्हिडीओ चित्रीत केला होता. त्यामुळे पूनम विरोधात सुद्धा पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती.