आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा उतरणार मैदानात; वरळी विधानसभा निवडणुकीत रंगणार तिहेरी लढत

Maharashtra Assembly Election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी रविवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. ज्यात वरळीतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवरा यांची लढत आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत होणार आहे.
तिरंगी लढत रंगणार
महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे रिंगणात असल्याने आता वरळीत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे यांना तिकीट देण्यात आले आहे. वरळीत 2019 मध्ये मनसेनं आदित्य ठाकरेंना पाठींबा दिला होता. पण आता राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना तिकीट दिले आहे. Maharashtra Assembly Election 2024|
मिलिंद देवरा यांना संधी
महायुतीत मुंबईतील वरळी मतदारसंघावर भाजप व शिंदेसेनेने दावा केला होता. भाजपकडून वरळीतून लढण्यासाठी शायना एनसी इच्छुक होत्या. मात्र जागाच शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यानं शायना एनसींचा पत्ता कट झाला. तर आदित्य यांच्याविरुद्ध शिंदेसेनेकडून राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांना लढवावे, असा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांचा होता. अखेर वरळीतून टक्कर देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. Maharashtra Assembly Election 2024 |
दरम्यान, मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आले. त्यानंतर शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदारही केलं.
हेही वाचा:
अखेर कराड उत्तरचा तिढा सुटला ! महायुतीकडून मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर





