मिकी माऊसमधून पडून बालकाचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

हिंगोली (प्रतिनिधी) – संगमेश्वर संस्थानात भागवत सप्ताहानिमित्त यात्रा भरलेली आहे. यात्रेत खेळण्यासाठी ठेवलेल्या मिकी माउसच्या आकाराचा फुगा मुलांसह अचानक हवेत उडाला. यावेळी 100 फुट उंचावरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू, तर चार जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजेदरम्यान घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कनेरगाव नाका येथील कर्ममेळा वसतिगृहातील तीन विद्यार्थी दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यावर येथील पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या संगमेश्वर संस्थानात सप्ताहाच्या सांगतेनिमित्त महाप्रसाद घेण्यासाठी गेले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर ते यात्रेतील मिकी माउसच्या आकाराचा फुग्यावर जम्पिंगच्या खेळण्यावर खेळत होते.

अचानक सुसाट्याचा वारा सुटल्याने ते खेळणे वाऱ्यासोबत शंभर फुट उंच उडाले. यावेळी त्यातून खाली पडल्याने मनोहर राघोजी मोरे (10) हा जागीच ठार झाला. तर प्रवीण राघोजी मोरे (12), शिवाजी देवीदास जहरव (11, तिघेही रा. बाभुळगाव ता. सेनगाव), करण रमेश धुळे (13, रा. शेंबाळपिंपरी ता. उमरखेड) व डिगांबर माधव बर्वे (6, रा. मोप ता. हिंगोली) हे चौघे जखमी झाले.

जखमींना वाशिम येथील खाजगी रुणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मयत बालकाला फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच कनेरगाव पोलीस चौकीचे जमादार साहेबराव राठोड कर्मचाऱ्यांसह धाव घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.