Middle East War: “अपाचे हेलिकॉप्टर, बी-५२ बॉम्बर…” ; अमेरिकेने इराणला कसे वेढले ; ट्रम्प यांचे संरक्षण सचिव हेगसेथ यांनी उघड केला प्लॅन
Middle East War: मध्य पूर्वेत सुरु असणाऱ्या युध्याच्या झाला सध्या सगळ्या जगाला बसत आहेत . त्यातच अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले सुरूच आहेत .

Middle East War: मध्य पूर्वेत सुरु असणाऱ्या युध्याच्या झळा सध्या सगळ्या जगाला बसत आहेत . त्यातच अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले सुरूच आहेत . दरम्यान, अमेरिकेने इराणला कशाप्रकारे वेढले आहे. याची सविस्तर माहिती ट्रम्प यांचे संरक्षण सचिव हेगसेथ यांनी माहिती दिली आहे.
अमेरिकेने डिसेंबर २०२५ पासून इराणवर लष्करी नाकेबंदी लादली आहे. इराणवर दबाव आणण्यासाठी त्यांनी युद्धनौका, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि हजारो सैनिक तैनात केले आहेत.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलने इराणवर हल्ला केला, ज्यामुळे अमेरिकेने हल्ले सुरू केले. वीस दिवस उलटले आहेत आणि दोन्ही देशांनी इराणला उद्ध्वस्त केले आहे. इराणने अरब देशांवर हल्ला करून नुकसान पोहोचवले असले तरी, त्याची स्वतःची लष्करी आणि आण्विक क्षमता नष्ट झाली आहे. Middle East War
होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी सहा देश एकत्र आले आहेत, त्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून सुरक्षेसाठी लष्करी आणि राजनैतिक पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. पश्चिम आशियामध्ये नवीन तैनाती सुरू असल्याने अमेरिका इराणसोबतचे युद्ध लांबवण्यास कटिबद्ध आहे.
पेंटागॉनने नियोजित वेळेच्या आधीच ४,००० ते ५,००० अमेरिकी मरीन सैनिकांसह ‘यूएसएस त्रिपोली’ ही विमानवाहू नौका पश्चिम आशियात पाठवली आहे. ‘यूएसएस त्रिपोली’ पश्चिम आशियामध्ये आपली जागा घेईल. दरम्यान, ‘यूएसएस जेराल्ड फोर्ड’ आगीमुळे झालेल्या नुकसानीनंतर दुरुस्तीसाठी ग्रीसमधील क्रीट येथील अमेरिकी तळाकडे जात आहे.
अमेरिकी सैन्य होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करतीय Middle East War
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी हा दावा केला आणि २० दिवसांच्या युद्धाबद्दल अद्ययावत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिकेची ए-१० लढाऊ विमाने आणि एएच-६४ अपाचे हेलिकॉप्टर्स दक्षिण इराणमध्ये सक्रिय आहेत. याच भागात असलेली होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकी सैन्याने सुरक्षित केली आहे.
दरम्यान, बी-१, बी-२ आणि बी-५२ बॉम्बर्स इराणच्या हद्दीत दूर पल्ल्याच्या लष्करी कारवाया करत आहेत. नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात असलेले सैनिक, लढाऊ विमाने आणि शस्त्रे दक्षिण इराणमधील बॉम्बर्स आणि लष्करी कारवायांना पाठिंबा देत आहेत.
२० दिवसांत ७,००० इराणी लक्ष्यांवर हल्ला Middle East War
संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी, अमेरिकेने २० दिवसांत इराणमधील ७,००० हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केला आहे आणि हे युद्ध अमेरिकेच्या अटींवरच संपेल. अमेरिकेची युद्ध लांबवण्याची कोणतीही योजना नाही, परंतु जर इराणने हल्ले सुरूच ठेवले किंवा शरणागती पत्करण्यास नकार दिला, अशी माहिती दिली.
तर अमेरिकेला त्यानुसार योजना आखावी लागेल. सध्या, अमेरिकेची लष्करी मोहीम निर्णायक टप्प्यात आहे, कारण इराणची लष्करी क्षमता, क्षेपणास्त्र निर्मिती आणि युरेनियम संवर्धन क्षमता नष्ट झाली आहे. इराण आता अण्वस्त्रे विकसित करू शकत नाही.
इराणचा क्षेपणास्त्रांचा साठा ९० टक्क्यांनी कमी झाला आहे. हेगसेथ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, इराणने इस्रायल आणि अरब देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामुळे इराणचा क्षेपणास्त्रांचा साठा ९० टक्क्यांनी कमी झाला आहे.
इराणचे ड्रोन हल्ले देखील कमी झाले आहेत आणि इराण आता पुढील हल्ले करण्यास सक्षम नाही. अमेरिकी सैन्य योजनेनुसार काम करत आहे आणि इराणचे पाण्याखालील बोगदे नष्ट करण्यासाठी हल्ले करत आहे. १८ मार्च रोजी, अमेरिकी सैन्याने इराणच्या बोगद्यांच्या ठिकाणी ५,००० पौंड वजनाची भेदक युद्धसामग्री टाकली आणि १२० इराणी जहाजे बुडवली.






