नगर, (प्रतिनिधी)- शहरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन या मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवला आहे. शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली तर बरीच कामे प्रगतीपथावर आहेत.
आता उद्योग व रोजगार वाढण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर शहराच्या जवळच 600 एकर जागेत नवी एमआयडीसी लवकच निर्माण करत आहोत. शहराला नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात शहरात अनेक उड्डाणपूलही होणार आहेत.
शहराचा विकास करताना मी सुखदुःखात नगरकरांसाठी 24 तास उपलब्ध आहे. पण बरीच लोक निवडणूक आली की भूछत्रा सारखी दिसतात व नंतर निघून जातात, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी प्रचार सुरु केला असून शहरात विविध भागांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे.
मंगळवारी सकाळीच शहरातील उच्चभ्रू व प्रतिष्ठित नागरिकांच्या नगर क्लबच्या सदस्यांची संवाद साधून गेल्या पाच वर्षात शहराचा आमदार या नात्याने केलेल्या विकास कामांचा धावता आढावा घेतला. यावेळी नगर क्लबच्या वतीने उपाध्यक्ष सीए.अशोक पितळे यांनी आ. जगताप यांचे स्वागत केले.
यावेळी क्लबचे सचिव नरेंद्र फिरोदिया, संचालक सुमतिलाल कोठारी, सीए. प्रवीण कटारिया, पेमराज बोथरा, हेमेंद्र कसावा, दिलीप बोरा, अॅड.जयदीप भापकर, अॅड.किशोर देशपांडे, स्त्यान गुंदेचा, डॉ.जयंत भापकर, सुभाष जग्गी, अॅड. सुभाष काकडे आदींसह मोठ्या संख्यने क्लबचे सदस्य उपस्थित होते.
पितळे म्हणाले, नगर शहराच्या अर्थकारणाला खेळ बसली आहे. ती दूर करण्यासाठी एखादा मोठा प्रकल्प नगरमध्ये येणे आवश्यक आहे.
यासाठी नव्या एमआयडीसीमध्ये असा एखादा प्रकल्प व्हावा, यासाठी आमदार जगताप यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
प्रस्ताविक सुमतीलाल कोठारी यांनी केले. यावेळी अॅड.अशोक कोठारी, डॉ.आर.आर. धुत, राजू भिंगारवाला, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, अशोक मोरे, डॉ. निसार, सागर बोरा आदी उपस्थित होते.