हजारो कर्मचारी एका झटक्यात होणार बेरोजगार, ‘ही’ मोठी कंपनी करणार नोकर कपात

Tech Layoffs: मागील 2 वर्षांपासून टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, एचपी आणि मेटासह जगभरातील अनेक टेक कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. आता 2025 मध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टसह अनेक प्रमुख कंपन्या यावर्षी कर्माचारी कपात करणार आहे.
मायक्रोसॉफ्ट, ब्लॅकरॉक, ॲली फायनान्शिअल, वॉशिंग्टन पोस्ट, ब्रिजवॉटर असोसिएट सारख्या मोठ्या जागतिक कंपन्या यावर्षी कर्मचारी कपात करणार आहेत. मायक्रोसॉफ्टकडून ही कपात वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाऊ शकते. यात सर्वाधिक कपात ही सायबर सुरक्षा विभागातून केली जाण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने देखील या संभाव्य कामगार कपातीबाबत पुष्टी केली आहे. गेल्या काही महिन्यांतील कंपनीच्या व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. कपात ही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मुल्कांकन करूनच केले जाणार आहे.
मायक्रोसॉफटच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी नेहमीच उच्च कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते. लोकांना शिकण्यास आणि पुढे जाण्यास मदत करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्परअसतो. जेव्हा कर्मचारी योग्य कामगिरी करत नाहीत, त्यावेळी असे पाऊल उचलावे लागते.
अल्ट्रूइस्ट, एक्वा सिक्योरिटी, सोलरएज टेक्नोलॉजीज आणि लेव्हल सारख्या लहान कंपन्या देखील 2025 मध्ये कर्मचारी कपात करणार आहेत. दरम्यान, 2024 मध्ये देखील टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली होती. या वर्षात 1200 पेक्षा अधिक टेक कंपन्यांनी 2 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांना काढले होते. यामध्ये सर्वाधिक कपात इंटेल आणि टेस्ला या कंपन्यांनी केली होती.





